७४
मी कितीही विसरलो स्वत:ला
सतत तुलाच स्मरणार आहे,
मी राहिलो कितीही एकांतात
तुझ्याबरोबर असणार आहे .
७३
मी फक्त तुझ्यासाठी जगतोय
याची जाणीव करून दयायचय,
त्यासाठी मला तुझ्यासोबतीनं रहायचय .
७२
तुझ्याशिवाय मला
एकटं एकटं रहायचय,
माझ्याशिवाय तू
कशी राहतेस तेहि पहायचय .
७१
तुझ्याकडे येताना मला
आवर्जुन ऊशीरा यायचय,
तू बेचैन झालेली
मला चोरून पहायचय .
Friday, December 24, 2010
Subscribe to:
Posts (Atom)