Monday, November 3, 2014

टवाळकी

टवाळकी
1.
तुझ्याकडे फिरून पाहताना
माझ्या मानेला त्रास होतो
तू मागे असलीस
की डोके जड़ झाल्याचा भास होतो

2.
तुझा राग काही
माझ्यासाठी नवीन नाही
आयुष्यभर संभाळायला
मी काही किरण किंवा प्रवीण नाही

3.
संध्याकाळ झाली की
आठवणी साद घालतात
आजकालच्या स्त्रिया हुश्शार
त्या नवा-याशीच वाद घालतात

4.
जगु दे मला
तुझ्या विना क्षणभर
बघू दे कधीतरी मलाही
हसू माझ्या चेह-यावर

5.
एकदा रातकीडयाचा आवाज
मी लोकल मध्ये ऐकला
मुंबईची गर्दी पाहून
तोही रस्ता चुकला