Tuesday, October 27, 2020

चारोळ्या १२९

 

१२९
तू सोबत असण्याने
मला फरक पडतो.
कारण आयुष्याची गोळाबेरीज
मी तुझ्यासोबतच करतो.

१२८
तुझ्याशी मी
नेहमी खरं बोलतो
कारण खोटे बोलताना
माझा शब्द सुद्धा थरथरतो.

१२७
तुझा आवाज ऐकण्यासाठी
माझे मन खूप अतुर असते,
तुझ्या एका शब्दांतसुद्धा
तुझ्या मनातील जवळीक दिसते.

१२६
तू आहे, मी आहे, हे जग आहे
हाच खरा मेळ आहे,
आयुष्य जाईल असेच निघून
जगून घे, हीच खरी वेळ आहे.

१२५
प्रेम असावे सागरासारखे
अथांग, अफाट आणि दिव्य,
छोट्या-मोठ्या नद्यांना कवेत घेणारे
महाकाय, अनंत आणि भव्य

चारोळ्या १२४


१२४

माझ्या न बोलण्याने 

तुला काय फरक पडतोय?

पण तू जर एकदा बोलली नाहीस तर
माझा जीव ढसाढसा रडतोय,
आणि तुझ्या फोनची वाट बघत
रात्र जागत काढतोय.

१२३
डिजिटल जमान्यात आपण
आपल्यातच हरवू नये,
घरात एकत्र असून सुद्धा
मग परक्यासारखं राहू नये.

१२२
जे शब्दात न सांगता, डोळ्यात दिसते
त्यालाच प्रेम म्हणावे,
म्हणून त्याला आवडेल
तसे मग आपणही वागावे.

चारोळ्या १२१

काही गोष्टींमुळे आपल्या 

जीवनाला अर्थ असतो
त्यापैकी एक म्हणजे आपले मित्र
म्हणून मित्रांना कधीही विसरू नका.

Tuesday, October 6, 2020

चारोळ्या १२०

 १२०

तुझ्याशी बोलताना 

मन कसं मोकाट सुटतं, 

आणि इतरांबरोबर मात्र 

निशब्द होऊन बसतं.


११९

स्वप्नांची पूर्ती करताना 

काहूर मनात दाटते, 

तुझ्यासोबत मला या आसमंतात 

उंच उंच भरारी घ्यावीशी वाटते. 


११८

आज मला काहीतरी 

नवीन करायचंय, 

या खडतर जीवनातून 

जरा अलगद बाहेर पडायचंय. 


चारोळ्या ११७

 ११७

तू जवळ असो किंवा दूर
मला काही फरक पडत नाही,
कारण तुझ्या-माझ्या मनात
कधीच अंतर पडत नाही.

११६

तुझी सोबत असणं
हेच माझ्यासाठी पुरेसं आहे,
पण तुझी सोबत नसेल
तर हे जीवन सुद्धा नकोसं आहे.

११५

तू जीवनात असशील
तर मी माझी पर्वा करत नाही,
तुझ्याशिवाय माझे आयुष्य
मी आयुष्यच धरत नाही.

Thursday, October 1, 2020

चारोळी ११४

११४ 
 माझा प्रत्येक क्षण 
 तुझ्या आठवणीत जातो, 
 आठवणींच्या दुनियेत मग 
 मीही रमत राहतो. 

 ११३ 
पणती पेक्षा जास्त मोल 
पणतीतल्या वातीला असतं, 
जगण्याचा अर्थ तेव्हाच कळतो 
जेव्हा कुणीतरी साथीला असतं. 

 ११२ 
हल्ली मी जास्त 
आरशात पाहणं टाळतो,  
कारण आरसाच तो, नेहमी खरं बोलतो 
म्हणून मीच दूर पळतो. 

 १११ 
तुला आवडत असेल 
माझं तुझ्यावर रागावणं, 
पण मला नाही जमत इतरांसारखं
लगेच खोटं खोटं हसणं. 

 ११० 
लोक काहीही सांगतील 
म्हणून तू त्यांचं ऐकावंस का ? 
मी ही तुझाच आहे ना ? 
मग तू काय लगेच विसरावंस का? 

 १०९ 
प्रत्येक क्षणी मला 
तुझा विचार येतो , 
तू काय म्हणशील यासाठी नाही 
माझ्यामुळे तुला वाईट वाटू नये यासाठी.