माझा प्रत्येक क्षण तुझ्या आठवणीत जातो,
आठवणींच्या दुनियेत मग मीही रमत राहतो.
पणती पेक्षा जास्त मोल पणतीतल्या वातीला असतं,
जगण्याचा अर्थ तेव्हाच कळतो जेव्हा कुणीतरी साथीला असतं.
हल्ली मी जास्त आरशात पाहणं टाळतो ,
कारण आरसाच तो नेहमी खरं बोलतो म्हणून मीच दूर पळतो.
तुला आवडत असेल माझं तुझ्यावर रागावणं,
पण मला नाही जमत इतरांसारखं लगेच खोटं खोटं हसणं.
लोक काहीही सांगतील म्हणून तू त्यांचं ऐकावंस का ?
मी ही तुझाच आहे ना ? हे तू काय लगेच विसरावंस का?
प्रत्येक क्षणी मला तुझा विचार येतो
तू काय म्हणशील यासाठी नाही
माझ्यामुळे तुला वाईट वाटू नये यासाठी.