Tuesday, July 5, 2011

शुभेच्छा

शब्द असते शक्ति
शब्द म्हणजे भक्ति
शब्दाला नसते कुठलेही गाव
त्याचा नसतो कुठेही ठाव

अशाच शब्दांची कबुतरे जेंव्हा विचारांच्या खुराड्यातून निळ्याभोर आकाशात उडून आपले अनुभवाचे पंख फड्फड्तात. अशाच या पंखाची साठवण, प्रत्येक ह्रुदयात राहील त्याचीच आठवण, अखंड शब्द-शब्दांची, जोड़ तीच ही " जोड़ शब्दांची", ही आवृत्ति कवी - सुनील जगदाळे यांची ।

त्यास आमच्या कोटि कोटि शुभेच्छा .......

-सोम
D.S.V.R.P.
Medico -Theropy group

७८

७८
तुझ्या नजरेत पाहताना
मी स्वत: ला विसरून जातो,
कारण माझेच प्रतिबिंब
मी तुझ्या नजरेत पाहतो .

७७
अर्धे आयुष्य झोपण्यात जातं
तरीही माणुस झोपल्याशिवाय रहात नाही,
शरीराला हवा असतो क्षणभर विसावा
हे मात्र आपण मान्यच करत नाही.

७६
जीवनात बंधनं
सर्वांनाच नको असतात ,
कारण लादलेली बंधनं मग
काटयासारखी बोचतात .

७५
रात्रीची स्वप्ने पाहण्यात
एक वेगळीच मजा आहे,
दिवसा मात्र दुभंगलेली स्वप्ने पाहणे
ही एक सजा आहे .

Friday, December 24, 2010

७४

७४

मी कितीही विसरलो स्वत:ला
सतत तुलाच स्मरणार आहे,
मी राहिलो कितीही एकांतात
तुझ्याबरोबर असणार आहे .

७३
मी फक्त तुझ्यासाठी जगतोय
याची जाणीव करून दयायचय,
त्यासाठी मला तुझ्यासोबतीनं रहायचय .



७२
तुझ्याशिवाय मला
एकटं एकटं रहायचय,
माझ्याशिवाय तू
कशी राहतेस तेहि पहायचय .

७१
तुझ्याकडे येताना मला
आवर्जुन ऊशीरा यायचय,
तू बेचैन झालेली
मला चोरून पहायचय .

७१

Thursday, September 30, 2010

शुभेच्छा

अथांग सागराच्या बाहुपाशात उसळणार्या लाटांचं आस्तित्व क्षणभंगुर जीवनासारखंच ....... परन्तु काव्याच्या विश्वात शब्दांचं यादवी युद्ध एखाद्या पहिल्या पावसाची करून हाक ...... माझे मित्रवर्य श्री सुनील यांचा हा स्तुतिपूर्ण व मनाचा अलिप्त भाव तन्मयतेने फुलवनारा त्यांच्या 'जोड़ शब्दांची ' त्या ओघवत्या शब्दांना व त्यांच्या प्रथम प्रयत्नाला माझ्या लाख लाख शुभेच्छा ।

-संदीप केदार

Tuesday, December 29, 2009

७०.

७०.
तू समोर असलीस की
नुसतंच बघावसं वाटतं,
तू जवळ नसलीस की
तुझ्यासोबत जगावसं वाटतं।

६९.
दुरून नजर देतेस
बाजुला हसून जातेस,
प्रेमाची भाषा कळूनसुद्धा
तू मुकी का राहतेस।

६८.
तुला वजा केल्यावर
बाकी काहीच उरत नाही,
तुझ्याशिवाय माझे आयुष्य
आयुष्यच उरत नाही।

६७.
माझे तुझ्यावर प्रेम आहे
पण मी सांगू शकत नाही,
मी तुला ह्रदय दिले
पण तू वळुनसुद्धा पाहत नाही।

६६.
शब्द शब्द आठवून तुझे
तुला मी स्मरते,
दिवस जरी हसण्यात गेला
तरी रात्रभर मी रडते।

Tuesday, June 16, 2009

sms

पल भर में टूट जाए वो कसम नही,

आपको भूल जाए वो हम नही,

तुम हमें भूल जाओ इस बात में दम नही,

क्योंकि तुम हमें भूल जाओ इतने भी बुरे हम नही.