Tuesday, April 14, 2009

५५.


५५.
चुकत असताना सुधारण्यासाठी
मदतीचा हात दे,
सात जन्माची नाही
निदान एक जन्माची तरी साथ दे.

५४.
जवानी तुझीच आहे
ती इतरांच्या हवाली करू नकोस,
माझ्याशिवाय तू मात्र
इतर कुणालाही वरु नकोस.

५३.
मला एकटच राहू दे तुझ्याविना
मी एकटाच बरा आहे,
तुझ्या आठवणीतला सहवास
तो मात्र खरा आहे.

Wednesday, April 8, 2009

५०.

५० .
तुझं रागवणं साहजिक आहे
कारण माझं येणं उशिरा झालं
त्यात माझा दोष काहीच नाही
रस्त्यातून काळं मांजर आडवं गेलं.

४९ .
तू माझ्या असण्यावर जाऊ नको
मी तुझ्या सोबत नसलो
तरी माझ्या नसण्यावर जाऊ नको.

४८ .
पहिल्या प्रेमाची पहिली आठवण
माझ्या मनात कोरली,
माझी हक्काची होती ती
ती पण तू चोरली.

४७ .
राजाची राणी होण्यास
सर्वजणीच तयार नसतात,
पण एकाच राणीसाठी
सर्व राजे तयार असतात.

४६ .
तू मित्रांचा आहेस
मित्र तुझे नसतील,
तुझ्याशी वैर साधणारे
तुझेच मित्र असतील.

४५.
तुझ्या मैत्रीची भाषा
खरंच मला कळत नाही,
कदाचित ते प्रेम असेल
म्हणुन मीही दूर पळत नाही.

४४.
तुझ्याविना एकेक क्षण
म्हणजे वर्षासारखा वाटतो,
तू येवून भेटलीस की
माझा शब्द सुद्धा दाटतो.

४३.
मी चांगलाच आहे
वाईट कधी वागत नही,
मला फक्त तू हवी आहेस
मी दुसरं काही मागत नाही.

Tuesday, April 7, 2009

४२.


४२.
जीवन कशासाठी आहे
हे जेंव्हा कळतं,
सुखी जीवनाचं गुपीत
तेंव्हाच तर मिळतं.

४१.
तुझ्या प्रेमाची नशा
माझ्या डोळ्यात दिसेल,
तू नाही म्हटलीस
तरी मी मात्र तुझाच असेल.

४०.
क्षणोक्षणी वाट पाहण्यात
वेगळाच आनंद आहे,
चोरून तुझ्याकड़ं पाहणं
हा तर माझा छंद आहे.

३९.
प्रत्येकास वाटतं मी
इतरांपेक्षा वेगळं असावं,
वेगळ्या स्वभावानं
इतरांच्या मनात बसावं.

३८.
तुझ्या माझ्यातील संवाद
कुणीतरी ऐकला होता,
तुझ्या नकाराने मात्र
माझ्या ह्रदयाचा ठोका चुकला होता.

३७.
सागरी लाटा पहायला
मलाही आवडतात,
पण त्याच जर खवळल्या
तर जीव घेवून जातात.

३६.
समुद्र किनारचा वारा
तुझे केस हलवतो,
केसाच्या एक बटेने
तुझे सौंदर्य खुलवतो.

३५.
तुझ्या सोबत असताना
मला शब्दांची जोड़ असते,
तू नसलीस की मात्र
तुझ्या येण्याची ओढ़ असते.

३४.
प्रत्येकासाठी पहिलं प्रेम
हा अनुभव नवा आहे,
कितीही नाकारला तरीही
तो प्रत्येकालाच हवा आहे.