Monday, October 10, 2011

प्रकाशक

जोड़ शब्दांची
(चारोळी संग्रह )


प्रकाशक
सुनिल आनंदराव जगदाळे
श्रमिक , जी -३०५, प्लाट -१७ , सेक्टर-२०
खारघर, नवी मुंबई - ४१० २१०.

प्रथमावृत्ती
अश्विन कृ. ८ शके १९३३ कालाष्टमी

गुरूवार दि.२० /१०/ २०११

प्रकाशनाचे सर्व हक्क :
कैलाश आनंदराव जगदाळे

आगामी काव्यसंग्रह
*************

अक्षर जुळवणी
*************


मूल्य : फक्त- २५/- रुपये

आभार

प्रिय सहकारी मित्रहो ,
न्यू इंडिया एश्योरन्स कं. तील कर्मचारी श्री सुनील आ जगदाळे यांचा पहिला प्रयत्न.
कळत नकळत मला प्रोत्साहन देणाया माझ्या न्यू इंडिया एश्योरन्स कं. तील सर्वांचाच मी ऋणी आहे .
माझ्यातील हा कवी/चरोळ्याकार शब्दरुपाने बाहेर पडावा, जनतेसमोर यावा त्याचे पुस्तक छापले जावे असे माझ्या सर्वच मित्रांना वाटत होते पण त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणारे काही मित्र / मैत्रिणी- उज्वला, कविता, राजश्री, शमीम, विजयालक्ष्मी,विद्या, खुशाल, अशोक, जितु, संतोष, सोमू, संदीप, ज्ञानदेव, चिंटू असे एक ना अनेकांनी जाणते अजाणतेपणी माझ्या प्रयात्नांना खतपाणी दिले या सर्वांचेच आभार ।

आपल्याला जर " जोड़ शब्दाची " चारोळीसंग्रह हे पुस्तक हवे असेल तर खालील नंबरवर संपर्क करा .

धन्यवाद.

सुनील आ. जगदाळे
९८२०३६८४७२/८२९११८५५८४
दि न्यू इंडिया एश्योरन्स कं. लि. ,न्यू इंडिया सेंटर
मु क्षे का -३ , ३ रा माळा, १७/ऐ कुपरेज रोड , मुंबई-१

Sunday, October 9, 2011

मनोगत

मुंबई म्हणजे धावते जगच. या धावत्या जगात जीवनातला जास्तीत जास्त वेळ मुंबईकर हा घराबाहेर प्रवासात असतो. अशाच लोकलच्या प्रवासामध्ये अनेकजण अनेक संकल्पना उरांशी बाळगुन असतात आणि त्या सत्यात आणण्याचा प्रयत्नही करतात याच प्रवासामध्ये मीही तुमच्या सोबतीने रोज ये-जा करतो आहे, त्यातूनच मला हा कवी-संकल्पनेचा सुर गवसला आणि मी लिहू लागलो माझे बरेचसे काव्य, लिखाण हे लोकलमधीलच आहे. जगण्याची ही नवी रीत मला नव्याने अनुभवायला मिळाली आणि मग वेगवेगळ्या विषयांवर मी लिहायला लागलो त्यामध्ये कधी जीवन, प्रेम, कधी "ती" तर कधी "मी" वर चार ओळी लिहित गेलो. या चारोळ्या तुम्हाला वेगळ्या विश्वात घेऊन जातील, आणि तुमच्या भावनांना वेगळी दिशा देईल अशी आशा आहे ।

आपला

सुनिल जगदाळे

Wednesday, October 5, 2011

९८

९८
प्रत्येकाची नजर तुझ्याकडे वळू दे,
प्रत्येकाच्या ह्रुदयात तुला जागा मिळू दे
मी समजावीन स्वत:ला कसाही
कारण जळणे काय असते तेहि मला कळू दे.

९७
क्षणभराची भेट आपली
रात्रंदिवस आठवणी देऊन जाते.
स्वप्नांच्या पलिकडे
स्वर्गसुखात घेऊन जाते.

९६
जेंव्हा तू माझ्याशी भांडतेस
तू मला फार आवडतेस
कारण भांडताना सुद्धा
तू मला प्रेमानेच जिंकतेस.

९५
तुझे कौतुक केले तर
तुला खोटे वाटते,
नाहीच बोललो तरी
मनात काहुर दाटते.

९४
तुझ्याइतकी रूपवान
मी आजपर्यंत पाहिली नाही
माझ्यासाठी तूच माझी स्वप्नपरी
सुष्मिता/ऐश्वर्या राहिली नाही

९३
मला खुप वाटतं की
तू माझ्यासोबत असावंस
जीवनातले चांगले वाईट क्षण
सोबतीने कुरुवाळत बसावंस

९२
तू मला वाईट कधीही
वागूच दिले नाहीस
कारण तू इतरांप्रमाणे मला
एकटे कधी जगुच दिले नाहीस.

९१
मीही झुरतोय तुझ्या प्रेमासाठी
थोड़े प्रेम करून तर बघ
चल, स्वत:साठी राहू दे जगायचं
थोडं माझ्यासाठी जगुन तर बघ.

९०
प्रेम आहे तुझं नि माझं
तुझ्या माझ्या जवानीचं
हे नाही म्हातारपणीच
आणि नाही बाळपणीचं.

८९
दिवसाची रात्र करून मी
वाट तुझी पहात होतो
एक एक क्षण तासासारखा
वाटुन मोजत होतो.

८८
तुझ्या येण्याने मी
पुरता बावरलो
कारण तुझे सौंदर्यच अलौकिक
क्षणभरात मी स्वत:लाही विसरलो.

८७
एक क्षण सुद्धा तासासारखा
वाटू लागतो तू सोबत नसताना
दिवस सुद्धा कमी पडतात मग
गप्पांसाठी तू सोबत असताना

८६
मी देव कधी पाहिला नाही
पण त्यासाठी ह्रदय वाहिलं आहे
मी तुझं ह्रदयही कधी पाहिलं नाही
पण त्यासाठी माझं सारं आयुष्य मात्र वाहिलं आहे.

८५
प्रेम पाहण्यासाठी नाही
ते अनुभवण्यासाठी असते
ते घेण्याबरोबरच
इतरांना देण्यासाठीही असते.

८४
बरेच जन्म घ्यावे लागतील
तुझे प्रेम मिळविण्यासाठी
तरीही तू मिळशील की नाही शंका आहे
कारण सगळीकडे तुझ्याच सौंदर्याचा डंका आहे

८३
समुद्राच्या काठावर
मुलीच्या ओठावर
सविनय शांतता दिसते
पण तीसुद्धा जास्त वेळ कुठे असते?

८२
तुझ्या प्रेमासाठी मला
पुर्णपणे वहात जायचंय
दूर कुठेतरी तुझ्यासोबत
घरकुल करून रहायचंय.

८१
प्रेम ओळखावे नजरेने
शब्द कमी पडतात म्हणुन
आजही दया इशार्याना किंमत
नका पाहू बोलून

८०
कळ्यांना फुले येतील
फुलांना सुगंध असतील
तुलाही मित्र मिळतील
पण माझ्या इतके प्रेम करणारे कुणीच नसतील

७९
बहुधा आई आणि प्रेयसीच्या
प्रेमाची तुलना केलेली आपण पाहतो
पण प्रियकर हुश्शार
तो दोघीँनाही किंमत देऊन जातो.

Thursday, August 4, 2011

सूविचार

१. दररोज सूर्य उगवतो,आशेचा किरण घेवून
माणूस जीवन जगतो,आशा मानत ठेवून।

२. चांगल्या माणसातला "चांगुलपणा" ओळखायला आपल्या अंगी चांगुलपणा असावा लागतो.

३. जीवनाच्या नाण्याला सुख आणि दुःख अशा दोन बाजू असतात त्याशिवाय जीवन पूर्ण होत नाही.

४. माझ्यातील "मीपणा " अचानक जागृत झाला पण इतरांचे मोठेपण पाहून तोही वाहून गेला.

५. मला वाटलं मी किती दुखी आहे ? पण इतरांचे दुःख पाहिल्यावर कळले की मी किती सुखी आहे.

६. जीवनात सुखाच्या वेळी सुख येतं, दुखाच्या वेळी दुःख , आपण फक्त ते उपभोगण्याची तयारी ठेवली पाहिजे

7. एक सत्य लपविण्यासाठी अनेकवेळ खोटं बोलावं लागतं त्यासाठी नेहमी सत्य बोलावं, खरं बोलावं .

8. अस्अत्याशी तडजोड म्हणजे स्वत:चीच फसवणुक .

9. प्रत्येक गोष्टीसाठी ठराविक वेळ आहे त्या वेळेत ती पूर्ण केली तरच ती शोभून दिसते .

10. जीवन जगत असताना प्रत्येकास तडजोड ही करावीच लागते .

11. कोण , कुणासाठी किती व कशा प्रकारची मदत करतो त्यावरून त्याचा स्वभाव, विश्वास व अनुभव ओळखता येतो .

12.  इतरांनी आपले कौतुक केले म्हणून अति-भारावून जाऊ नका, यापेक्षा ज्यास्त कौतुक कसे होईल यासाठी प्रयत्नशील रहा .

13. या जगात कुणीच कुणाला रोखू शकत नाही पण "चुक" रोखू शकते , आपल्या चुकीने आपणास अपमान सहन करावा लागतो .

14. सर्वांचेच विचार चांगले असतात असे नाही म्हणून तर चांगली माणसेही फसतात .

15. शहाणी माणसे एकदाच बोलतात , मुलीचा बाप एकदाच कन्यादान करू शकतो .

16. वेळेत काम पूर्ण करणे यातच हुश्शार माणसाची हुश्शारकी असते .

17. आपण सत्कार्य करत असाल तर त्याची नोंद आपल्याकडे ठेवायला हावी .

18. ज्याचेकडून आपण काहीतरी शिकलो तो त्या क्षेत्रातला आपला गुरु झाला .

19. यशाची अपेक्षा न ठेवता कर्म करत राहिलात तर यश नक्कीच तुमच्या पायाशी असेल .

20. यश मिळविन्यासाठी कष्ट , त्रास घेतलेच पाहिजेत त्यातच यशाची किंमत आहे .

21. कोणतेही चांगले काम करायचे असल्यास वेळ किंवा दिवस पाहू नये ते लगेच सुरु करावे .

22. इतरांचे चांगले करू शकत नसाल तर निदान वाईटतरी करू अथवा चिंतू नका .

23. अनुभवाने आलेले शहाणपण केव्हाही श्रेष्ठच .

24. मीपणाचा कळस झाला की, माणुस इतरांचे वाईट चिंतु लागतो .

25. माणसाचं शहाणपण हे त्याच्या कतृत्वावरुन ठरतं त्याच्या कपडयावरून नव्हे .

26. नशिबावर अवलंबून राहाणारास नशीब साथ देत नाही तर प्रयत्नशील असणारास नशिबाची साथ मिळते .

27. स्वत:ला मोठे व्हायचे असेल तर इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करा .

28. तुम्ही इतरांना श्रेष्ठत्व दया, इतरांच्या नजरेत तुम्ही नेहमीच श्रेष्ठ रहाल .

29. आपल्या मनासारखं उत्तर मिळत नाही तोपर्यंत एकाच प्रश्न माणुस अनेकांना विचारतो .

30. वाईट प्रसंगी जे मित्र सहकार्य करत नाहित ते असून नसल्यासारखेच .

31. सन्मार्गी लावतो तोही मित्रच आणि वाईटमार्गी लावतो तोही मित्रच त्यासाठी संगत चांगल्या मित्राचीच असावी  .

32.  मैत्रीमध्ये व्यवहार येता कामा नये नाहीतर मैत्री तुटायला वेळ लागत नाही .

33. आपल्या प्रश्नाचं उत्तर ज्याचेकडून मिळतं त्याला आपण श्रेष्ठ मानु लागतो .

34.यशाचे मूळ शिक्षणात आहे म्हणून शिक्षण हे घेतलेच पाहिजे .

35. समाजात चांगले आणि वाईट याची तुलना नेहमीच केली जाते, समाजाच्या तुलनेत आपण काय करतो ते आपणच पाड़ताळावे .

36. कोणतेही कृत्य करण्याअगोदर त्याचा पूर्णपणे विचार करावा, मगच ते करावे .

37. काम पूर्ण करणे हे हुश्शार माणसाचे कर्तव्य क्षणोक्षणी दृष्टीस पड़ते .

38. सूचना देणारे लोकच जर ती पाळत नसतील तर ज्याना सूचना करतो तेही ती पाळतीलच असे नाही .

39. इतरांना शिक्षण देताना ती शिक्षा आपल्याला अवगत असणे गरजेचे  आहे .

40. इतरांना देई ज्ञान, स्वत: कोरडा पाषाण ... असे व्यक्तिमत्व काय कामाचे ..........

41.  देवाने मानवाला दू:खापेक्षा सुखच जास्त दिले आहे परन्तु मानव हे मान्यच करत नाही , सतत दू:खाचाच गवगवा करत असतो म्हणून तो दू:खी होतो .

42. राजा व प्रजा यांच्यात मोठा फरक आहे, राजा हुकुम सोडतो तर प्रजा त्याचे पालन करते .

43. आकाशात विहार करण्यासाठी पक्षाला पंखाची गरज असते, तसेच मानवाला आनंदी जीवन जगण्यासाठी साथीदाराची गरज असते .

44. चांगला साथीदार निवडणे हे हुश्शार माणसाचे लक्षण आहे .

45. जगात सर्व काही चुकवता येईल पण मरण कुणालाच चुकवता येणार नाही .

46. मरणाची भीती असणारा माणूस राष्ट्रसेवा किंवा जनसेवा करू शकत नाही .

47. चांगले मरण हवे  तर सत्कार्य , पुण्य, सुकर्म करायला विसरु नका .

48. सुखाची हिरवळ हवी असेल तर दू:खाचे काटेरी कुंपण ओलांडलेच पाहिजे .

49. जो माणूस सुख मिळाले तरी सुख मानत नाही त्याच्या इतका दू:खी दूसरा कुणी नाही .

50. सुखदु:खाच्या वाटेवरच मानवाची प्रकृति आणि प्रगति अवलंबून आहे .

51. स्वत:वर विश्वास आणि देवावर श्रध्दा ठेवा , तुम्ही कुणाचे वाईट केले नाही तर तुमचेही वाईट होणार नाही .
52. कोणतेही ज्ञान सहजासहजी मिळत नाही त्यासाठी ते गृहण करण्याची पात्रता आपल्याकडे असावी लागते .

53. वाईट परिणामांचे मुळ जिभेत आहे म्हणून नेहमी इतरांशी गोड बोलावे .
54. जो जसे वागतो त्याला तसेच सहन करावे लागते ही जीवनाची रीत आहे .

55. जीवन हे उमलते फूल आहे त्यास रादाक्य काट्यांनी डिवचू नका, त्याचे हास्यमय रुपाने स्वागत करा ते फुलतच राहील  .
56. तापलेल्या तव्यात जर पाण्याचा एक थेंब टाकला तर चुर्र्चुर्र असा आवाज होतो आणि तो थेंब वाफेमार्फत नष्ट होतो यावरून आपण मैत्री कुणाशी ठेवावी याचे भान ठेवले पाहिजे . 
57. व्यवहारातून मिळालेला अनुभव बरेच काही शिकवून जातो म्हणून माणसाने व्यवहारिक असेल पाहिजे .

58. जर तुम्ही एखाद्याला सुखी ठेवत नसाल तर कमीत कमी त्याला दू:ख तरी देऊ नका .

59. इतरांच्या सुखाने सुखी होणारा माणूस लवकर सुखी होतो .

60. कोणीही आपले चांगले विचार आपल्या मनात ठेवू नयेत तर ते लेखणीद्वारे इतरांपर्यंत पोहोचवावेत तीच तय विचारांची जागा असते .

61. महाराष्ट्रात अशी एकही स्त्री मिळणार नाही , जिला आपला पति दारु पिलेला आवडतो . (जर तीही  पित नसेल तर )

62. चुकतो तोच माणूस पण माणसाने एकच चुक पुन्हा पुन्हा केली तर त्याची प्रगति खुंटते .

63. व्यसनाधीन झालेला माणूस व्यसनमुक्त होणे अशक्यच पण त्याचे प्रयत्न त्यास व्यसनमुक्त नक्कीच बनवु शकतात .

64. आपण कुणाला मदत करू शकत नसाल तर इतरांकडूनही मदतीची अपेक्षा ठेऊ नका .

65. ज्ञान लहानांपासुनही मिळते त्यासाठी लहानांना कमी न समजता त्या ज्ञानाचा लाभ घ्यावा .

Tuesday, July 5, 2011

शुभेच्छा

शब्द असते शक्ति
शब्द म्हणजे भक्ति
शब्दाला नसते कुठलेही गाव
त्याचा नसतो कुठेही ठाव

अशाच शब्दांची कबुतरे जेंव्हा विचारांच्या खुराड्यातून निळ्याभोर आकाशात उडून आपले अनुभवाचे पंख फड्फड्तात. अशाच या पंखाची साठवण, प्रत्येक ह्रुदयात राहील त्याचीच आठवण, अखंड शब्द-शब्दांची, जोड़ तीच ही " जोड़ शब्दांची", ही आवृत्ति कवी - सुनील जगदाळे यांची ।

त्यास आमच्या कोटि कोटि शुभेच्छा .......

-सोम
D.S.V.R.P.
Medico -Theropy group

७८

७८
तुझ्या नजरेत पाहताना
मी स्वत: ला विसरून जातो,
कारण माझेच प्रतिबिंब
मी तुझ्या नजरेत पाहतो .

७७
अर्धे आयुष्य झोपण्यात जातं
तरीही माणुस झोपल्याशिवाय रहात नाही,
शरीराला हवा असतो क्षणभर विसावा
हे मात्र आपण मान्यच करत नाही.

७६
जीवनात बंधनं
सर्वांनाच नको असतात ,
कारण लादलेली बंधनं मग
काटयासारखी बोचतात .

७५
रात्रीची स्वप्ने पाहण्यात
एक वेगळीच मजा आहे,
दिवसा मात्र दुभंगलेली स्वप्ने पाहणे
ही एक सजा आहे .