Monday, October 10, 2011

प्रकाशक

जोड़ शब्दांची
(चारोळी संग्रह )


प्रकाशक
सुनिल आनंदराव जगदाळे
श्रमिक , जी -३०५, प्लाट -१७ , सेक्टर-२०
खारघर, नवी मुंबई - ४१० २१०.

प्रथमावृत्ती
अश्विन कृ. ८ शके १९३३ कालाष्टमी

गुरूवार दि.२० /१०/ २०११

प्रकाशनाचे सर्व हक्क :
कैलाश आनंदराव जगदाळे

आगामी काव्यसंग्रह
*************

अक्षर जुळवणी
*************


मूल्य : फक्त- २५/- रुपये

आभार

प्रिय सहकारी मित्रहो ,
न्यू इंडिया एश्योरन्स कं. तील कर्मचारी श्री सुनील आ जगदाळे यांचा पहिला प्रयत्न.
कळत नकळत मला प्रोत्साहन देणाया माझ्या न्यू इंडिया एश्योरन्स कं. तील सर्वांचाच मी ऋणी आहे .
माझ्यातील हा कवी/चरोळ्याकार शब्दरुपाने बाहेर पडावा, जनतेसमोर यावा त्याचे पुस्तक छापले जावे असे माझ्या सर्वच मित्रांना वाटत होते पण त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणारे काही मित्र / मैत्रिणी- उज्वला, कविता, राजश्री, शमीम, विजयालक्ष्मी,विद्या, खुशाल, अशोक, जितु, संतोष, सोमू, संदीप, ज्ञानदेव, चिंटू असे एक ना अनेकांनी जाणते अजाणतेपणी माझ्या प्रयात्नांना खतपाणी दिले या सर्वांचेच आभार ।

आपल्याला जर " जोड़ शब्दाची " चारोळीसंग्रह हे पुस्तक हवे असेल तर खालील नंबरवर संपर्क करा .

धन्यवाद.

सुनील आ. जगदाळे
९८२०३६८४७२/८२९११८५५८४
दि न्यू इंडिया एश्योरन्स कं. लि. ,न्यू इंडिया सेंटर
मु क्षे का -३ , ३ रा माळा, १७/ऐ कुपरेज रोड , मुंबई-१

Sunday, October 9, 2011

मनोगत

मुंबई म्हणजे धावते जगच. या धावत्या जगात जीवनातला जास्तीत जास्त वेळ मुंबईकर हा घराबाहेर प्रवासात असतो. अशाच लोकलच्या प्रवासामध्ये अनेकजण अनेक संकल्पना उरांशी बाळगुन असतात आणि त्या सत्यात आणण्याचा प्रयत्नही करतात याच प्रवासामध्ये मीही तुमच्या सोबतीने रोज ये-जा करतो आहे, त्यातूनच मला हा कवी-संकल्पनेचा सुर गवसला आणि मी लिहू लागलो माझे बरेचसे काव्य, लिखाण हे लोकलमधीलच आहे. जगण्याची ही नवी रीत मला नव्याने अनुभवायला मिळाली आणि मग वेगवेगळ्या विषयांवर मी लिहायला लागलो त्यामध्ये कधी जीवन, प्रेम, कधी "ती" तर कधी "मी" वर चार ओळी लिहित गेलो. या चारोळ्या तुम्हाला वेगळ्या विश्वात घेऊन जातील, आणि तुमच्या भावनांना वेगळी दिशा देईल अशी आशा आहे ।

आपला

सुनिल जगदाळे

Wednesday, October 5, 2011

९८

९८
प्रत्येकाची नजर तुझ्याकडे वळू दे,
प्रत्येकाच्या ह्रुदयात तुला जागा मिळू दे
मी समजावीन स्वत:ला कसाही
कारण जळणे काय असते तेहि मला कळू दे.

९७
क्षणभराची भेट आपली
रात्रंदिवस आठवणी देऊन जाते.
स्वप्नांच्या पलिकडे
स्वर्गसुखात घेऊन जाते.

९६
जेंव्हा तू माझ्याशी भांडतेस
तू मला फार आवडतेस
कारण भांडताना सुद्धा
तू मला प्रेमानेच जिंकतेस.

९५
तुझे कौतुक केले तर
तुला खोटे वाटते,
नाहीच बोललो तरी
मनात काहुर दाटते.

९४
तुझ्याइतकी रूपवान
मी आजपर्यंत पाहिली नाही
माझ्यासाठी तूच माझी स्वप्नपरी
सुष्मिता/ऐश्वर्या राहिली नाही

९३
मला खुप वाटतं की
तू माझ्यासोबत असावंस
जीवनातले चांगले वाईट क्षण
सोबतीने कुरुवाळत बसावंस

९२
तू मला वाईट कधीही
वागूच दिले नाहीस
कारण तू इतरांप्रमाणे मला
एकटे कधी जगुच दिले नाहीस.

९१
मीही झुरतोय तुझ्या प्रेमासाठी
थोड़े प्रेम करून तर बघ
चल, स्वत:साठी राहू दे जगायचं
थोडं माझ्यासाठी जगुन तर बघ.

९०
प्रेम आहे तुझं नि माझं
तुझ्या माझ्या जवानीचं
हे नाही म्हातारपणीच
आणि नाही बाळपणीचं.

८९
दिवसाची रात्र करून मी
वाट तुझी पहात होतो
एक एक क्षण तासासारखा
वाटुन मोजत होतो.

८८
तुझ्या येण्याने मी
पुरता बावरलो
कारण तुझे सौंदर्यच अलौकिक
क्षणभरात मी स्वत:लाही विसरलो.

८७
एक क्षण सुद्धा तासासारखा
वाटू लागतो तू सोबत नसताना
दिवस सुद्धा कमी पडतात मग
गप्पांसाठी तू सोबत असताना

८६
मी देव कधी पाहिला नाही
पण त्यासाठी ह्रदय वाहिलं आहे
मी तुझं ह्रदयही कधी पाहिलं नाही
पण त्यासाठी माझं सारं आयुष्य मात्र वाहिलं आहे.

८५
प्रेम पाहण्यासाठी नाही
ते अनुभवण्यासाठी असते
ते घेण्याबरोबरच
इतरांना देण्यासाठीही असते.

८४
बरेच जन्म घ्यावे लागतील
तुझे प्रेम मिळविण्यासाठी
तरीही तू मिळशील की नाही शंका आहे
कारण सगळीकडे तुझ्याच सौंदर्याचा डंका आहे

८३
समुद्राच्या काठावर
मुलीच्या ओठावर
सविनय शांतता दिसते
पण तीसुद्धा जास्त वेळ कुठे असते?

८२
तुझ्या प्रेमासाठी मला
पुर्णपणे वहात जायचंय
दूर कुठेतरी तुझ्यासोबत
घरकुल करून रहायचंय.

८१
प्रेम ओळखावे नजरेने
शब्द कमी पडतात म्हणुन
आजही दया इशार्याना किंमत
नका पाहू बोलून

८०
कळ्यांना फुले येतील
फुलांना सुगंध असतील
तुलाही मित्र मिळतील
पण माझ्या इतके प्रेम करणारे कुणीच नसतील

७९
बहुधा आई आणि प्रेयसीच्या
प्रेमाची तुलना केलेली आपण पाहतो
पण प्रियकर हुश्शार
तो दोघीँनाही किंमत देऊन जातो.