Tuesday, March 19, 2019

गीत ५

गीत ५
सांग सखे तू सांग मला, स्वप्नी तू माझ्या येशील का?
स्वप्नपरी तू स्वर्गा मधली, राणी माझी होशील का ?
सुख दुःखाच्या या जीवनी, साथ तु मला देशील का?
तवा चुलीचा माझा संसार, युगे युगे तू करशील का ?

Monday, March 18, 2019

गीत ४

गीत ४
जरा जपून चाल ग पोरी
तुझी कंबर लचकेल ना || धृ ||
ऊंच सैंडल मध्ये, नखर्‍यात चालताना
पाय मुरगळेल ना

तरण्या पोरांच्या नजरा तुझ्यावर
तू चालताना लचकत्या कमरेवर
सांभाळ स्वत:ला, तोल तुझा जाईल ना || १ || जरा जपून ...

स्वप्नी येऊन निघून निघून जाते,
प्रेम सुखाचा लळा लाविते
तुझ्या प्रेमात, वेडा मी होईल ना || २ || जरा जपून ...

गीत 3

गीत 3
तुझ्या प्रीतीचे वेड मला लागले
सांगू कसे प्रिये मी, माझे मलाच ना कळे ||धृ ||

रूप तुझे सुंदर, गालावरती कळी
स्वप्नसुंदरी तू, दिसतेस चाफेकळी
वेडा झालो तुजवरी, जीव क्षणोक्षणी जळे ||१||
सांगू कसे प्रिये मी, माझे मलाच ना कळे

लाखात उठून दिसते, अशी तू लावण्यवती
तुझे सौंदर्य वर्णावया, शब्दही अपुरे पडती
तुझ्या आठवणींनी, तहानभूकही दूर पळे ||२||
सांगू कसे प्रिये मी, माझे मलाच ना कळे

Wednesday, March 13, 2019

गीत २

M
सांग प्रिये सांग जरा
वाट तू माझी पाहशील का ?
सागरी किनारी दगडे मारीत
आठवण माझी करशील का ? ||धृ||

M
यौवनाच्या कातरवेळी
लावण्याची कळी उमलली
सौंदर्याचा धुंद सुगंध
सांग प्रिये तू देशील का ? ||१||

F
वाट पाहुनी डोळे थकले
मन भेटाया आतुर झाले
सांग सजना सांग जरा
लवकर भेटीला येशील का ? ||२||

M
सांग प्रिये सांग जरा
वाट तू माझी पाहशील का ?
सागरी किनारी दगडे मारीत
आठवण माझी करशील का ?

गीत १


तुझ्याचसाठी प्रिये जन्मलो
तुझ्याचसाठी जन्मा आलो ।।धृ।।

तूच माझी आणि मीच तुझा
तुझ्याविना जीव रहावेना माझा
तुझ्या आठवणीत मी विरून गेलो
तुझ्याचसाठी जन्मा आलो ।।१।।

सूर छेडलेस, तू हृदयातून
तुझ्यासाठी प्रिये, गेलो हरपून
सप्तसुरांचे नाद ऐकुनी, देहभान मी विसरुन गेलो
तुझ्याचसाठी जन्मा आलो ।।२।।
तुझ्याचसाठी जन्मा आलो

108

108
जीवन असे जगा
ज्याची कुणी वल्गना करेल,
जीवन असे नको
ज्याची कुणी चेष्टा करेल.

107
काळोख्या अंधाराला
एका दिव्याची भीती असते,
माणसातल्या सद्गुणांना
एका दुर्गुणाची भीती असते.

Sunday, March 10, 2019

चारोळी 106


106.
जीवन उलगडायला थोडासा वेळ लागतो
आणि उलगडलं
तर ते समजायला
खर्‍याखुर्‍या दोन मनांचा मेळ लागतो.

105.
तुझा नि माझा नजरेचा अबोला
म्हणजे एक दुवा आहे,
न सांगताही बऱ्याच गोष्टी समजणं
हाच एक मोठा ठेवा आहे

104.
तुझ्या-माझ्यात नेहमी
एक साम्य गवसते,
कुठलीही गोष्ट तुला
न सांगताही पटकन समजते.

103.
साडीमधल्या बाईचा पदर
तिच्या संस्कृतीचे दर्शन घडवितो,
पण तोच पदर जर खांद्यावरून घसरला
तर संपूर्ण आयुष्य बिघडवतो..

102.
आज-काल स्त्रीच्या
रूपाचं खूप कौतुक केलं जातं
वरवरच्या कौतुकानं
तिला क्षणोक्षणी छेडलं जातं.