Sunday, March 10, 2019

चारोळी 106


106.
जीवन उलगडायला थोडासा वेळ लागतो
आणि उलगडलं
तर ते समजायला
खर्‍याखुर्‍या दोन मनांचा मेळ लागतो.

105.
तुझा नि माझा नजरेचा अबोला
म्हणजे एक दुवा आहे,
न सांगताही बऱ्याच गोष्टी समजणं
हाच एक मोठा ठेवा आहे

104.
तुझ्या-माझ्यात नेहमी
एक साम्य गवसते,
कुठलीही गोष्ट तुला
न सांगताही पटकन समजते.

103.
साडीमधल्या बाईचा पदर
तिच्या संस्कृतीचे दर्शन घडवितो,
पण तोच पदर जर खांद्यावरून घसरला
तर संपूर्ण आयुष्य बिघडवतो..

102.
आज-काल स्त्रीच्या
रूपाचं खूप कौतुक केलं जातं
वरवरच्या कौतुकानं
तिला क्षणोक्षणी छेडलं जातं.

No comments:

Post a Comment