Tuesday, March 19, 2019

गीत ८

गीत ८
सायंकाळच्या वेळी, सागरकिनारी, वाट तुझी पाहत होतो
कुठून येशील तू याचा अंदाज लावीत होतो

तुझी वाट पाहताना आठवणींचे काहूर उठले
तुझ्यासवे सखे ग शब्द नाही फुटले
तू येण्याअगोदर स्वतःशीच मी बोलत होतो
सायंकाळच्या वेळी, सागरकिनारी, वाट तुझी पाहत होतो

तुझी चाहूल लागता काहूरले माझे मन
तुला पाहण्यासाठी प्रिये आतुरले हे नयन
समुद्राच्या लाटांमध्ये तुला न्याहाळत होतो
सायंकाळच्या वेळी, सागरकिनारी, वाट तुझी पाहत होतो

No comments:

Post a Comment