Tuesday, March 26, 2019

गीत १४

गीत १४

तेरी सुरत मैं देखुं जरा
दिलबरा ... दिलबरा ... दिलबरा || धृ ||

मेरी चाहत ना, होगी ये कम
मै तो चाहुंगा, सातों जनम
तेरी चाहत, मैं चाहूं जरा || १ ||

तेरी दिवानगी, की कसम
तुझपें मरते रहेंगे, जनम जनम
आ.. मै तुझे छुं लूं जरा || २ ||

गीत १३

गीत १३

तेरा चेहरा....तेरा चेहरा
सुबह-शाम याद आये || धृ ||

सुबह देखुं, तू नजर आये
शाम को मेरी, यादों में बसाये || १ ||

तेरी यादों ने, दिवाना बनाया
मुझको जमाने सें, अनजाना बनाया
तेरे सिवा कुछ, अब नजर ना आये || २ ||

गीत १२

गीत १२

मी तुला स्वप्नामध्ये पाहिलं गं
साजणी साजणी......
होशील का तू माझी राणी?

तुझ्यासाठी देह सारा झिजवीन गं
तुझ्यासाठी जीवसुध्दा देईन गं

तुझ्यासाठी हाल-अपेष्टा सोसीन गं
तुझ्यासाठी कष्टसुध्दा करीन गं

गीत ११

गीत ११

तुला पाहताना, भान विसरलो मी
वाटे जसे स्वर्गातुनी, स्वप्नसुंदरी आली || धृ ||

डौलदार शरीराला, सौंदर्याची खाण
नाजूक चालणं तुझं, वाटे मज शान
तुला पाहण्याने, इच्छा पूर्ण झाली || १ ||

गीत १०

गीत १०
ती: ये राजसा वाट पाहू किती?
तो: वो साजणी तू तर माझी प्रीती || धृ ||

ती: तुजवाचुनी मला करमेना
तो: काय करावं मला समजेना
ती : साऱ्या आठवणी जाग्या होती || १ ||

तो: ठाऊक नाही त्या चांदण्याला
ती: ठाऊक नाही त्या चंद्रमाला चंद्रमाला चंद्रमाला
तो: प्रीती आपली जन्मो-जन्मीची
ती: साथ आपली साताजन्माची
तो: या दुनियेला सांगू किती || २ ||

गीत ९

गीत ९

तुझं माझ्यावर, माझं तुझ्यावर
प्रेम हे जडलं, सांगू कसं मी तुला
ये प्रीत फुला, घे जवळी मला ||धृ ||

दूर नको जाऊ, संगतीनं राहू
वेळ नको लावू, अंत आता पाहू
जीव माझा वेडा झाला || १ ||

मीच तुझी अन् तूच माझा
तूच माझ्या, दिलाचा राजा
सांगू कसे मी तुला || २ ||

Tuesday, March 19, 2019

गीत ८

गीत ८
सायंकाळच्या वेळी, सागरकिनारी, वाट तुझी पाहत होतो
कुठून येशील तू याचा अंदाज लावीत होतो

तुझी वाट पाहताना आठवणींचे काहूर उठले
तुझ्यासवे सखे ग शब्द नाही फुटले
तू येण्याअगोदर स्वतःशीच मी बोलत होतो
सायंकाळच्या वेळी, सागरकिनारी, वाट तुझी पाहत होतो

तुझी चाहूल लागता काहूरले माझे मन
तुला पाहण्यासाठी प्रिये आतुरले हे नयन
समुद्राच्या लाटांमध्ये तुला न्याहाळत होतो
सायंकाळच्या वेळी, सागरकिनारी, वाट तुझी पाहत होतो