७०.
तू समोर असलीस की
नुसतंच बघावसं वाटतं,
तू जवळ नसलीस की
तुझ्यासोबत जगावसं वाटतं।
६९.
दुरून नजर देतेस
बाजुला हसून जातेस,
प्रेमाची भाषा कळूनसुद्धा
तू मुकी का राहतेस।
६८.
तुला वजा केल्यावर
बाकी काहीच उरत नाही,
तुझ्याशिवाय माझे आयुष्य
आयुष्यच उरत नाही।
६७.
माझे तुझ्यावर प्रेम आहे
पण मी सांगू शकत नाही,
मी तुला ह्रदय दिले
पण तू वळुनसुद्धा पाहत नाही।
६६.
शब्द शब्द आठवून तुझे
तुला मी स्मरते,
दिवस जरी हसण्यात गेला
तरी रात्रभर मी रडते।
Tuesday, December 29, 2009
Tuesday, June 16, 2009
sms
पल भर में टूट जाए वो कसम नही,
आपको भूल जाए वो हम नही,
तुम हमें भूल जाओ इस बात में दम नही,
क्योंकि तुम हमें भूल जाओ इतने भी बुरे हम नही.
Wednesday, May 13, 2009
६५.
६५.
जीवन हा एक खेळ आहे
जुन्या- नव्या संस्कृतीचा
हाच खरा मेळ आहे.
६४.
वाईटांमधला वाईट गुण
बरेच काही शिकवून जातो,
शिकणारा चलाख असेल
तर त्यातही चांगले शिकून जातो.
६३.
इतरांचे वाईट करण्याने
त्यांचे वाईट होत नाही,
स्वत:ला कितीही चांगले वाटले
तरी मग त्याचे चांगलेही होत नाही.
६२.
नाविन्याची लहर
थोड़े दिवस वाटते,
तिचाही कहर झाला की,
ती सुद्धा मनात दाटते.
६१.
सर्वच सूखे
सर्वासाठीच नसतात
पण माणसे विचित्र
ती सर्वच मिळवित बसतात.
६०.
वेळ कुणावरही
सदैव मेहरबान नसते,
कारण वेळेलाही वेळोवेळी
वेळेचे भान असते.
५९.
तुमच्या क्षणिक सुखासाठी
इतरांना दू:ख भोगावं लागतं,
इतरांना दू:ख होवू नये
त्यासाठी स्वत: नीट वागावं लागतं.
५८.
सुर्याचा एक किरण
सर्व अंधार घालवतो,
सुखाच्या एका क्षणासाठी
आपण आयुष्य दू:खात घालवतो.
५७.
हे जग असंच आहे
चांगल्यालाही वाईट म्हणणारं,
वाईटाला खतपाणी देऊन
चांगल्यालाच सुकवणारं .
जीवन हा एक खेळ आहे
जुन्या- नव्या संस्कृतीचा
हाच खरा मेळ आहे.
६४.
वाईटांमधला वाईट गुण
बरेच काही शिकवून जातो,
शिकणारा चलाख असेल
तर त्यातही चांगले शिकून जातो.
६३.
इतरांचे वाईट करण्याने
त्यांचे वाईट होत नाही,
स्वत:ला कितीही चांगले वाटले
तरी मग त्याचे चांगलेही होत नाही.
६२.
नाविन्याची लहर
थोड़े दिवस वाटते,
तिचाही कहर झाला की,
ती सुद्धा मनात दाटते.
६१.
सर्वच सूखे
सर्वासाठीच नसतात
पण माणसे विचित्र
ती सर्वच मिळवित बसतात.
६०.
वेळ कुणावरही
सदैव मेहरबान नसते,
कारण वेळेलाही वेळोवेळी
वेळेचे भान असते.
५९.
तुमच्या क्षणिक सुखासाठी
इतरांना दू:ख भोगावं लागतं,
इतरांना दू:ख होवू नये
त्यासाठी स्वत: नीट वागावं लागतं.
५८.
सुर्याचा एक किरण
सर्व अंधार घालवतो,
सुखाच्या एका क्षणासाठी
आपण आयुष्य दू:खात घालवतो.
५७.
हे जग असंच आहे
चांगल्यालाही वाईट म्हणणारं,
वाईटाला खतपाणी देऊन
चांगल्यालाच सुकवणारं .
Tuesday, April 14, 2009
५५.
५५.
चुकत असताना सुधारण्यासाठी
मदतीचा हात दे,
सात जन्माची नाही
निदान एक जन्माची तरी साथ दे.
५४.
जवानी तुझीच आहे
ती इतरांच्या हवाली करू नकोस,
माझ्याशिवाय तू मात्र
इतर कुणालाही वरु नकोस.
५३.
मला एकटच राहू दे तुझ्याविना
मी एकटाच बरा आहे,
तुझ्या आठवणीतला सहवास
तो मात्र खरा आहे.
Wednesday, April 8, 2009
५०.
५० .
तुझं रागवणं साहजिक आहे
कारण माझं येणं उशिरा झालं
त्यात माझा दोष काहीच नाही
रस्त्यातून काळं मांजर आडवं गेलं.
४९ .
तू माझ्या असण्यावर जाऊ नको
मी तुझ्या सोबत नसलो
तरी माझ्या नसण्यावर जाऊ नको.
४८ .
पहिल्या प्रेमाची पहिली आठवण
माझ्या मनात कोरली,
माझी हक्काची होती ती
ती पण तू चोरली.
४७ .
राजाची राणी होण्यास
सर्वजणीच तयार नसतात,
पण एकाच राणीसाठी
सर्व राजे तयार असतात.
४६ .
तू मित्रांचा आहेस
मित्र तुझे नसतील,
तुझ्याशी वैर साधणारे
तुझेच मित्र असतील.
४५.
तुझ्या मैत्रीची भाषा
खरंच मला कळत नाही,
कदाचित ते प्रेम असेल
म्हणुन मीही दूर पळत नाही.
४४.
तुझ्याविना एकेक क्षण
म्हणजे वर्षासारखा वाटतो,
तू येवून भेटलीस की
माझा शब्द सुद्धा दाटतो.
४३.
मी चांगलाच आहे
वाईट कधी वागत नही,
मला फक्त तू हवी आहेस
मी दुसरं काही मागत नाही.
तुझं रागवणं साहजिक आहे
कारण माझं येणं उशिरा झालं
त्यात माझा दोष काहीच नाही
रस्त्यातून काळं मांजर आडवं गेलं.
४९ .
तू माझ्या असण्यावर जाऊ नको
मी तुझ्या सोबत नसलो
तरी माझ्या नसण्यावर जाऊ नको.
४८ .
पहिल्या प्रेमाची पहिली आठवण
माझ्या मनात कोरली,
माझी हक्काची होती ती
ती पण तू चोरली.
४७ .
राजाची राणी होण्यास
सर्वजणीच तयार नसतात,
पण एकाच राणीसाठी
सर्व राजे तयार असतात.
४६ .
तू मित्रांचा आहेस
मित्र तुझे नसतील,
तुझ्याशी वैर साधणारे
तुझेच मित्र असतील.
४५.
तुझ्या मैत्रीची भाषा
खरंच मला कळत नाही,
कदाचित ते प्रेम असेल
म्हणुन मीही दूर पळत नाही.
४४.
तुझ्याविना एकेक क्षण
म्हणजे वर्षासारखा वाटतो,
तू येवून भेटलीस की
माझा शब्द सुद्धा दाटतो.
४३.
मी चांगलाच आहे
वाईट कधी वागत नही,
मला फक्त तू हवी आहेस
मी दुसरं काही मागत नाही.
Tuesday, April 7, 2009
४२.
४२.
जीवन कशासाठी आहे
हे जेंव्हा कळतं,
सुखी जीवनाचं गुपीत
तेंव्हाच तर मिळतं.
४१.
तुझ्या प्रेमाची नशा
माझ्या डोळ्यात दिसेल,
तू नाही म्हटलीस
तरी मी मात्र तुझाच असेल.
४०.
क्षणोक्षणी वाट पाहण्यात
वेगळाच आनंद आहे,
चोरून तुझ्याकड़ं पाहणं
हा तर माझा छंद आहे.
३९.
प्रत्येकास वाटतं मी
इतरांपेक्षा वेगळं असावं,
वेगळ्या स्वभावानं
इतरांच्या मनात बसावं.
३८.
तुझ्या माझ्यातील संवाद
कुणीतरी ऐकला होता,
तुझ्या नकाराने मात्र
माझ्या ह्रदयाचा ठोका चुकला होता.
३७.
सागरी लाटा पहायला
मलाही आवडतात,
पण त्याच जर खवळल्या
तर जीव घेवून जातात.
३६.
समुद्र किनारचा वारा
तुझे केस हलवतो,
केसाच्या एक बटेने
तुझे सौंदर्य खुलवतो.
३५.
तुझ्या सोबत असताना
मला शब्दांची जोड़ असते,
तू नसलीस की मात्र
तुझ्या येण्याची ओढ़ असते.
३४.
प्रत्येकासाठी पहिलं प्रेम
हा अनुभव नवा आहे,
कितीही नाकारला तरीही
तो प्रत्येकालाच हवा आहे.
Wednesday, March 18, 2009
३२.
३२.
तुझ्या सौंदर्याचं कौतुक
मला इतरांकडून ऐकायचय,
माझ्या शब्दांची गाथा
खरी आहे का ? ते पहायचय.
३१.
प्रेमाची कदर त्यांनाच असते
जे कुणावर तरी प्रेम करतात,
प्रेम न करणारे मात्र
पक्षांसारखे झुरतात.
३०.
प्रेम कुणावरही जडतं
आसमंतातील प्रत्येकांवर,
प्रेम कुणासाठीही मरतं
प्रत्येकाच्या प्रेम करण्यावर
२९.
माझ्यावर प्रेम करताना
इतरांना का विचारतेस ?
नकारात्मक उत्तर देताना
मनातून का झुरतेस ?
२८.
तुझ्या नकारातसुद्धा होकार आहे
हे मला अवगत आहे,
मला नकार देऊन तू
स्वत:लच फसवत आहे.
तुझ्या सौंदर्याचं कौतुक
मला इतरांकडून ऐकायचय,
माझ्या शब्दांची गाथा
खरी आहे का ? ते पहायचय.
३१.
प्रेमाची कदर त्यांनाच असते
जे कुणावर तरी प्रेम करतात,
प्रेम न करणारे मात्र
पक्षांसारखे झुरतात.
३०.
प्रेम कुणावरही जडतं
आसमंतातील प्रत्येकांवर,
प्रेम कुणासाठीही मरतं
प्रत्येकाच्या प्रेम करण्यावर
२९.
माझ्यावर प्रेम करताना
इतरांना का विचारतेस ?
नकारात्मक उत्तर देताना
मनातून का झुरतेस ?
२८.
तुझ्या नकारातसुद्धा होकार आहे
हे मला अवगत आहे,
मला नकार देऊन तू
स्वत:लच फसवत आहे.
Subscribe to:
Posts (Atom)
